प्रेमात पडलं की


Business Park Rose
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर थोडसं
वेड्यासारखंच वागतात


यात काही चुकीचं नाही
सहाजिकच असतं सारं
एकदा प्रेमात पडलं की
उघडू लागतात मनाची दारं

मनातल्या भावना अलगद मग
कागदावरती उतरतात
डोळ्यांमधील आसवंसुद्धा
शब्द होऊन पसरतात

रात्रंदिवस तिचेच विचार
आपल्याला मग छ्ळू लागतात
उमजलेल्या बरयाच गोष्टी
तेव्हा मात्र कळू लागतात.

डोळ्याशी डोळा लागत नाही
एकाकी रात्री खायला उठतात
ओठांपाशी थांबलेले शब्द
कवितेमधून बाहेर फुटतात

गोड गोड स्वप्नं बघत मग
रात्र रात्र जागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात.

निव्वळ मूर्खपणाच्या गोष्टींसही
प्रेमात निरनिराळे अर्थ असतात
गणित, भूगोल, व्याकरण सारी
इथल्या व्यवहारात व्यर्थ असतात

अंगात फाटकी बनियन असली
तरी इस्त्रीचा शर्ट घालतात
जग जिंकल्याच्या तोरयात
छाती फुगवून ऎटीत चालतात

सभोवताली काय चाललंय
कशाचच नसतं भान
चालता बोलता तिचाच विचार
'तिचं हसणं किती छान?'

ठाणे, बोरिवलीच्या पुढे
एकदाही आपण गेलेलो नसतो
तरी तिच्यासाठी चंद्र-तारे
तोडून आणायला तयार असतो

तुझ्यावर खरंखुरं प्रेम आहे
असं हजारदा सांगतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात.

तिने हातास स्पर्श केला
तरी खूप आधार वाटतो
ती समोर नसल्यावर मात्र
खोल खोल अंधार दाटतो

फार कठोर वाटणारी माणसंही
अशा वेळी फार हळवी होतात
खरं सांगतो रात्र रात्र
अंधारात एकटीच गातात

अशाच वेळी आपल्यामधील
चांगला माणूस बाहेर पडतो
हळवा होऊन दुसरयासाठी
एकदातरी मनसोक्त रडतो

आपल्या इच्छा, आपली स्वप्ने
सारीच आपण बाजूला सारतो
दुसरयासाठी आनंदाने झुरतो
जेव्हा आपण प्रेम करतो

चुकून देवळात गेल्यावरही
फक्त एकच गोष्ट मागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात.

प्रेम तुझं खरं असेल तर..


storm cell #9
प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..

भावना तुझ्या शुद्ध असतील, तर
तीही त्यात वाहून जाईल
मनावर अमृत सरी झेलत
तीही त्यात न्हाहून जाईल..

विचार तुझा नेक असेल, तर
तीही तुझा विचार करेल
हृदयाच्या तिच्या छेडून तारा
सप्तसूरांचा झंकार उरेल..

आधार तुझा बलवान असेल, तर
तीही तूझ्या कवेत वाहील
मग, कितीही वादळं आलीत
तरी प्रित तुमची तेवत राहील..

आशा सोडण्या इतकं
जिवन निराशवादी नाही रे
तिला न जिंकता यावं इतकं
मानवी हृदय पौलादी नाही रे..

पण, मित्रा जर ती नाहीचं आली
तरीही तू हार मानू नकोस
तू तर प्रामाणिकपणे खेळलास
आयुष्याला जुगार मानू नकोस..

शेवटी आयुष्य हे वाहतचं राहतं
थांबत नाही ते कोणासाठी
घे भरारी पुन्हा गगनी
नव्यानं कुणीचा तरी होण्यासाठी.

{ही कविता म्हणजे, प्रेमात हताश, निराश झालेल्या एका प्रेमवीराला, त्याच्या
मित्रा कडून दिलेला सल्ला, नवी उमेध, नवी चेतना…….}

मलाही girl friend मिळावी...!

Innocent Eyes album cover
सुंदर मुलीशी ऒळख व्हावी,
आम्हा दोघांची मने जुळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥

हास्याच्या पहिल्या किरणाने,
प्रितीची खळी उमलावी ।
डोळ्यात जिच्या ऐश्वर्य असावे,
रूपाची ती राणी असावी ॥
अशीच माझी स्वप्नसुंदरी,
ह्र्दयाच्या नगरात रुळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥


चौपाटीवर पाणीपूरीतून,
प्रणयाचेच घास भरवू ।
रिक्षात मीटरला साक्षी मानून,
प्रेमाच्याच शपथा घेऊ ॥
आयुष्यातील सारी दु:खं,
जिच्या सहवासात टळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥

द्वीधा मनं मग मध्येचं म्हणत,
आधी girl की आधी friend ।
आयुष्यभराचं नातं हवं,
देव करो तीच्याकडूनचं,
प्रेमाची ख्ररी व्याख्या कळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी...!

शतजन्म मागावे कसे सोबति तुला....

Flower buds have not yet bloomed into a full-s...
स्वप्नातल्या कळ्या॑नो सा॑गाल का जरा
शतजन्म मगावे कसे सोबति तुला
हि साद घालि प्रिति जुळावे ब॑ध जेव्हा
न कळताच स्पर्श व्हावा त्या भावना॑चा
दर्पणात दिसावि मज तुझिच प्रतिमा
शतजन्म मागावे कसे सोबति तुला....

हि तार छेडिलि सुरातुनि तुझि
उमलुन पुश्प यावे जणिव होत क्षणि
होते पहाट जेव्हा तुझेच नाव घेता
शतजन्म मागावे कसे सोबति तुला....

शोधताना तुला आता भान हरपावे कसे
नयनात अश्रु दाट्ले दुर होताना जसे
जन्मगाठ हि युगा॑चि सा॑गावे पुन्हा पुन्हा
शतजन्म मगावे कसे सोबति तुला....
शतजन्म मागावे कसे सोबति तुला....

''फक्त मैत्रिण''

BEst-Friend
आहे एक वेडी मुलगी ,कस सांगू तिला
सारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ?
आहे ती सुंदर, दिसते ती मस्त,
माहित नाही ''फक्त मित्र '' समजते मला,की त्यापेक्षा जास्त?

तिला सांगण्याचा करतो मी नेहमी विचार,
पण जमत नाही आपल्याला मात्र,''तसले'' व्यवहार!
माहित आहे तिला, आहे मी खुप shy,
एवढे समजून ही ती स्वतच का नाही करत TRY?

''नाही'' म्हणाली तरी चालेल,समजू शकतो मी तेवढ,
आयुष्भर ''फक्त मैत्रिण'' रहा सांगायचा आहे तुला एवढ!

मनाला एकदा आसेच विचारले

Cyclamen flowers
मनाला एकदा आसेच विचारले
का इतका तिच्यात गुंततो ?
नाही ना ती आपल्यासाठी
मग का तिच्यासाठी झुरतो ?

कळत नाही तुला
त्रास मला भोगावा लागतो
आश्रूं मधे भिजून भिजून
रात्र मी जागतो.

मी म्हटले मनाला
का स्वप्नात रमतो ?
तिच्या सुखा साठी तू
का असा दुखात राहतो ?

मन म्हणाले
प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा
आपण स्वता ला विसरतो
सार काही तिच्यासाठी
ईतकेच मनाला समजावतो.

तुझ्यामध्ये आहेत ज्या उणीवा.

Ode to sadnessतुझ्यामध्ये आहेत ज्या उणीवा
हसत हसत तू काबुल कर
तुझ्यामध्ये आहेत ज्या जाणीवा
ओरडून ओरडून त्यांना जागं कर !!!!!!

झोपलं आहे तुझं जे भाग्य
डोळ्यांवर पाणी ओत खडबडून त्याला जागं कर
हेवा असेल प्रत्येक मनी तुझा
शत्रूवरही जगावेगळं प्रेम तू कर!!!!!!!

जर दिलासा शब्द तू कुणाला
त्या शब्दांचा तू आदर कर
शास्त्रशास्त्र पारंगत असलास जरी तू
तुझ्या अमोघ शब्दांनीच शत्रूला तू पराजित कर !!!!!

असेल जीवन तुझे वादळ वाऱ्यापरी
असेल जीवनी तुझ्या दु:ख आभाळाएवढं
असेल आयुष्य तुझं सदा संघर्षमय
जीवन इतरांचं मात्र प्रकाशित कर !!!!!!!!
या साईट वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.